आपण शेअर मार्केट काय असत हे पाहिल्यानंतर आता आपण पाहणार आहोंत कि हे शेअर्स कसे आणि कुठे खरेदी आणि विक्री करू शकतो. जस कि मी सांगितल्याप्रमाणे शेअर मार्केट हा एक प्रकारचा बाजारच आहे जिथे शेअर्स ची खरेदी आणि विक्री होते, आपल्याला माहित आहे कि बाजार हा एका विशिष्ठ ठिकाणी भरला जातो आणि तिथेच सर्व लोक एकत्र येऊन भाजीपाला खरेदी आणि विक्री करतात.
शेअर्स ची खरेदी विक्री पण एका विशिष्ठ ठिकाणी होते त्याला आपण एक्सचेंज (Exchange) असं म्हणतो. आता एक्सचेंज (Exchange) दोन प्रकारचे आहेत.

१. Bombay Stock Exchange (BSE)
२. National Stock Exchange (NSE)

आता या दोन ठिकाणी आपण डायरेक्ट जाऊन शेअर्स घेऊ शकत नाही. हे शेअर्स खरेदी आणि विक्री करण्यासाठी मधे काही लोकं असतात त्यांना आपण दलाल किंवा ब्रोकर असे म्हणतो. यांच्याद्वारे आपण हे करू शकतो.

आता तुम्ही म्हणाल कि ह्या लोकांशी आम्ही कसा कॉन्टॅक्ट करणार ?

तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे. हे जे ब्रोकर आहेत या व्यक्ती नसून हे कॉम्प्युटर्स आहेत जिथे आपण जाऊन अकाउंट काढू शकतो ते पण ऑनलाईन. या अकाउंट ला आपण डिमॅट (demat ) अकाउंट असं म्हणतो. आणि या अकाउंट वरून तुम्ही शेअर्स खरेदी किंवा विक्री करू शकता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *