1. What is Share Market ?

आजकाल तुम्ही रोज ऐकत असला कि शेअर मार्केट मध्ये एवढे पैसे लावले कि त्याचे अमुक अमुक एवढे returns मिळतात. प्रत्येकजणाला वाटत असत कि मी पण पैसे कमवले पाहिजेत आणि श्रीमंत बनलं पाहिजे. पण श्रीमंत बनणं हे खूप कष्टाचं काम आहे मग ते शेअर मार्केट असो कि अजून दुसरं कोणतं क्षेत्र.

शेअर मार्केट मधून पैसे तर नक्कीच मिळतात पण त्यासाठी तुम्हाला थोडे कष्ट पण करावे लागणार आहे. तुम्हाला समजून घ्यावं लागेल कि शेअर मार्केट काय आहे आणि यातून लोक पैसे कसे कमवतात.

आपल्या आजूबाजूला आपण बघितले तर खूप लोक तुम्हाला मिळतील जे कि तुम्हाला शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवा असं सांगितलं पण त्यांच्या एवढ्या बोलण्यावर जर तुम्ही पैसे गुंतवणार असाल तर तुम्ही श्रीमंत होण्याचे स्वप्न बगु नका. कधीही कोणच्या सांगण्यावरून शेअर मार्केट मध्ये पैसे गुंतवू नका. स्वतः त्याचा अभ्यास करा आणि आपले पैसे तिथे लावा. म्हणूनच आज मी तुम्हाला शेअर मार्केट काय असत हे सांगणार आहे.

कोविड (Covid) नंतर शेअर मार्केट मध्ये खूप लोकांनी गुंतवणूक चालू केली आहे पण खूप कमी जणांना याबद्दल माहिती आहे. त्यामुळे विचार केला कि जेवढं काही मला शक्य आणि माहिती असेल तेवढी माहिती मी लोकांना या ब्लॉग द्वारे देईन. तर चला मग शेअर मार्केट काय आहे हे पाहू.

शेअर मार्केट म्हणजे असा एक प्लॅटफॉर्म आहे, जिथे तुम्ही कोणत्याही पब्लिक कंपनींचे हिस्सेदार होऊ शकता. कोणतीही कंपनी चालवण्यासाठी तुम्हाला भांडवलाची गरज असते आणि हे भांडवल सगळ्या लोकांकडून गोळा केले जाते.त्यामुळेच तर अशा कंपन्यांना पब्लिक कंपनी असंहि म्हणले जाते. जितकी तुमची गुंतवणूक त्या प्रमाणात तुम्हाला नफा (Profit) दिला जातो आणि तुम्ही त्या कंपनीचे गुंतवूणूकदार (Investor) होता.

आज कोणते शेअर्स विकत घ्यायला पाहिजेत ? Which Best Shares to Buy today?

असं समजा कि हा एक प्रकारचा बाजार च आहे जिथे शेअर्स ची खरेदी आणि विक्री होते. जस बाजारात भाजी विकणारा आणि भाजी विकत घेणारा असतो त्याप्रमाणे Share Market मध्ये शेअर विकत घेणारे आणि शेअर्स विकणारे पण असतात. शेअर्स विकत घेणाऱ्यांना आपण बायर्स (Buyers) आणि शेअर विकणाऱ्यांना आपण सेलर्स (Sellers ) असे म्हणतो. how to invest in share market

शेअर मार्केटचा खेळ हा पूर्ण “मागणी”(Demand ) आणि “पुरवठा” (Supply) याच्यावर आहे. जेव्हा एखाद्या शेअर ची किंमत वाढते म्हणजे त्या शेअर ची मागणी वाढलेली असते आणि पुरवठा कमी झालेला असतो आणि जर हे उलट झालं तर शेअर ची किंमत कमी होते.

आता तुम्ही म्हणाल हा बाजार नेमका भरतो कुठे ?

यासाठी तुम्हाला पान पालटावं लागेल. पाण पालटण्यासाठी इथे क्लिक करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *