1. What is Mutual Fund :

आपण जाहिरातींमध्ये आणि अनेक लोकांमध्ये म्युचुअल फंड्सबद्दल झालेली चर्चा ऐकली असेलच. त्यामुळे तुमच्या मनात असणाऱ्या प्रश्नांची उत्तर द्यायला आणि म्युचुअल फंड्सविषयी संपूर्ण माहिती द्यायला मी आज हा लेख लिहीत आहे. आजच्या पोस्टमध्ये आपण म्युचुअल फंड्स म्हणजे काय आहे हे जाणणार आहोत. (what is mutual funds in Marathi) आणि म्युचुअल फंड्सविषयी मराठीतुन माहिती घेणार आहोत. (mutual fund Marathi information).

अनेकांना म्युचुअल फंड्स आणि शेअर बाजार (Share Market) सारखं वाटतं पण त्यांमध्ये फरक आहे. शेअर बाजारात रिस्क जास्त असते आणि नफा पण जास्त असतो, पण म्युचुअल फंड्समध्ये गुंतवणूक केल्याने रिस्क कमी असते आणि नफा शेअर बाजारांपेक्षा कमी असतो. शेअर बाजारातील पैसा एका कंपनीमध्ये गुंतवला जातो आणि तो वयक्तिक असतो पण म्युचुअल फंड्समध्ये फंड मॅनेजर कंपन्यांमध्ये थोडे-थोडे पैसे लावत असतो आणि तो गुंतवलेला पैसा लोकांचा असतो.

शेअर मार्केट (Share Market) म्हणजे काय ? What is share market in simple words?

2. फंड मॅनेजर म्हणजे काय ? Who is Fund Manager ?

साध्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एक म्युचुअल फंड हा खूप जणांचा पैसा एकत्र करून झालेलं फंड असतो. म्युचुअल फंड्समध्ये जमा केलेले पैसे हे वेगवेगळ्या कंपन्यानमध्ये गुंतवले जातात आणि त्याचा जो फायदा आहे तो सगळ्यांमध्ये वाटला जातो आणि जो माणूस फंड सांभाळतो त्याला थोडे पैसे मिळतात, त्या व्यक्तीला आपण फंड मॅनेजर सुद्धा म्हणतो.

फंड मॅनेजर हा त्या फंड चे व्यवस्थापन करतो. पैसे कोणत्या कंपनी मध्ये गुंतवायचे आणि कोणत्या कंपनी मधून बाहेर काढायचे हा त्याचा निर्णय असतो. फंड मॅनेजर यांचे शेअर मार्केट मध्ये अभ्यास असल्यामुळे तो एक प्रकारचा त्यांचा पेशा असतो.

त्यांचे कार्य वेगवेगळ्या फंड्सचे व्यवस्थापन करणे आणि त्या फंड्सचे पैसे योग्य ठिकाणी निवेश करणे असे असते. सरळ सांगायचं झालं तर त्यांचे काम ज्यांनी पैसे गुंतवले आहेत त्यांना रिटर्न्स कसे मिळतील हे असते.

म्युचुअल फंड्स मधील पैसे एका ठिकाणी निवेश न होता तो विविध कंपन्यांमध्ये Invenst केला जातो. हे पैसे बुडण्याची संभावना कमी होते. कारण जरी एक कंपनी मध्ये नुकसान झाले तरी बाकी कंपन्यांमध्ये फायदा हा झालेला असतो आणि नुकसान हे होत नाही किंवा कमी प्रमाणात होते.

3. म्यूच्युअल फंड मध्ये गुंतवणूक कशी करावी ? How to invest in mutual funds ?

आजच्या या इंटरनेट युगात आपण आपल्या घरामध्ये बसून आपले पैसे mutual फंड मध्ये गुंतवू शकतो. म्युचुअल फंड्समध्ये निवेश करण्यासाठी आपल्याकडे बँक खात्याची आवश्यकता असते. आपल्याला कोणता फंड पाहिजे तो निवडावा. निवडल्यानुसार, आपली गुंतवुनूक रक्कम त्या फंड मध्ये जमा केली जाते. म्हणजे आपण आपले पैसे फंड मॅनेजरांच्या संचालित केलेल्या फंडमध्ये योग्य ठिकाणी निवेश करतो.

हे सर्व फंडस् तुम्ही online चेक करू शकता. किंवा आजकाल खूप सारे Mobile Apps निघाले आहेत ते तुम्ही install karun त्यामध्ये पण बगु शकता. काही Apps च्या नावांची यादी मी खाली देत आहे.

Which Mutual Fund App is best for beginners ?

Coin by Zerodha
Groww
Paytm Money Mutual Fund App
Kuvera
ET Money
myCAMs Mutual Fund App
Piggy – Mutual Fund App
Angel Bee App

Mutual Fund मध्ये इन्व्हेंस्ट करताना तुमच्याकडे दोन ऑपशन्स आहेत.

  • LumSum अमाऊंट टाकणे
  • दरमहा एक विशिष्ठ अमाऊंट टाकणे.

पण सगळे फंडस् lumsum अमाऊंट टाकण्याचा पर्याय देत नाहीत. काही फंड असे असतात कि त्यामध्ये फक्त तुम्ही दरमहा अमाऊंट टाकू शकता. दरमहा अमाऊंट फंड मध्ये टाकणे याला आपण SIP ( Systematic Investment Plan) असेही म्हणतो. प्रत्येक महिन्याला तुम्ही ठरवलेली अमाऊंट तुमच्या खात्यामधून कट होऊन फुंडमध्ये जमा होते.
आणि हा अजून एक सांगायचं विसरून गेलो, तुम्ही अशी अमाऊंट दरमहा ठरवा कि जी तुम्हाला पुढील 10-15 वर्षे लागणार नाही. एकदा हि अमाऊंट दर महिन्याला गेली कि ती पुढील 10-15 वर्ष विसरून जायचे तरच तुम्हाला पाहिजेल असे रिटर्न्स मिळतील.

शेअर्स (Shares) कसे आणि कुठे विकत घेता येतात ?

4. करोडपती बनायचं आहे ना ? (How to Become a Billionaire ?)

आता म्हणाल याने तर Title मध्ये करोडपती कसं बनणार ते लिहलं आहे आणि त्याबद्दल काही बोललाच नाही. आता तुम्हीच बघा तुम्ह्याकडे किती धीर आहे, लगेच करोडपती बनायचं असत. आता title मध्ये टाकल्यामुळे मला सांगणं भाग आहे, पण लक्षात ठेवा लगेच करोडपती बनणार नाही यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. चला तर पाहू — कोण बनेगा करोडपती Kaun Banega Crorepati 2023 ?

श्रीमंत बनायचे असेल तर तुम्हाला पहिल्यांदा पैशांची बचत करावी लागणार. जेवढे तुम्ही पैसे वाचवाल तेवढा पैसा तुम्हाला वाचवेल. दर महिन्याला तुम्ही तुमच्या income नुसार ठरवायचे कि मला किती पैसे mutual फंड मध्ये टाकायचे आहेत. आता हे पैसे तुम्ही पुढील १०-१५ वर्षे काढायचे नाहीत. त्यामुळे ठरवतानाच अशी अमाऊंट ठरवा जी कि तुम्हाला लागणार नाही आणि हा खूपच अगदी अडचण आली तर काढू शकता. पण ती अडचण खूप मोठी असली तरच काढावेत.
आता तुम्ही दरमहा १००० रुपये इन्व्हेंस्ट केले पुढील १०-१५ वर्षांसाठी तर तुमची अमाऊंट किती होईल आपण हे calculate करू. हे Calcualations करण्यासाठी आपण mutual fund calculator चा उपयोग करणार आहोत. तुम्ही पुढे दिलेल्या लिंक वर जाऊन हे calculator पाहू शकता. Mutual Fund Calculator

5. How to use Mutual Fund Calculator

जेव्हा तुम्ही Calculator ओपन कराल तेव्हा तुम्हाला त्या Calculator मध्ये काही अंक टाकायचे आहेत.

  • I want to invest monthly : इथे तुम्ही तुम्हाला दरमहा किती पैसे टाकायचे आहेत ते टाकणार.
  • For a period of : इथे तुम्ही किती वर्षांसाठी हे पैसे टाकणार हे टाकायचं आहे.
  • My Investment Strategy : इथे तुम्हाला अंदाजे रिटर्न्स टाकायचे आहेत.

या सर्व values टाकल्यानंतर तुम्हाला दिसेल कि Compounding ची ताकद काय आहे.

जर आपण पुढल्या ३० वर्षांसाठी २००० रुपये प्रमाणे १५ percent रिटर्न्स नि calculate केले तर तुम्ही बघा आकडा काय येतो ते. आता म्हणाल ३० वर्षे एवढं कोण थांबणार, मग तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट पण वाढवणार ना थोढीच २००० रुपये ठेवणार. विचार करा आणि आजपासून च बचत करायला लागा.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *